अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले तसेच तीचा गर्भपात केल्याच्या गुन्ह्यातील घोडेगावयेथील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर येथून जेरबंद केले. याबाबत माहिती अशी की, सुनिल अंबादास तांबे (रा. घोडेगांव ता. नेवासा) याने नेवासा येथील अल्पवयीन मुलीस फुस लावुन, लग्नाचे आमिष दाखवून ती अल्पवयीन असताना तिचे सोबत शरीरसंबंध ठेवून अत्याचार केला तसेच गर्भपाताच्या गोळ्या देवुन तीचा गर्भपात केला.
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात मागील वर्षी (2023) अत्याचार, फसवणूक, गर्भपात, मारहाण तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी सुनिल तांबे रा. घोडेगांव, हा आगरकरमळा, रेल्वे स्टेशन अहमदनगर परिसरात राहतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने आगरकरमळा परिसरात फिरुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.