अहमदनगर ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन

0
32

ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद रामराव मिरीकर ( वय ७७) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने
निधन झाले..त्यांच्यामागे पत्नी, ३ विवाहित मुले ,नातवंडे असा परिवार आह.
मिरी येथील सरदार घराण्यातील वंशज मिरीकर यांनी तब्बल ४५ वर्ष पत्रकारिता केली. नगर शहराचा इतिहास ,संस्कृती, अध्यात्म साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या विषयातील ते जाणकार लेखक आणि अभ्यासक होते.
अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, स्नेहालय, अहमदनगर शहर आणि जिल्हा पत्रकार संघ, आदी सामाजिक संस्थांचे अण्णा आधारस्तंभ होते.
बुधवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.