शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” डॉ.बाबासाहेबांचा मूलमंत्र जोपासणे काळाची गरज

0
30

शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा डॉ.बाबासाहेबांचा मूलमंत्र जोपासणे काळाची गरज – मंगलताई भुजबळ .
अहमदनगर :-ओबीसी कॉंग्रेस च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त पुष्पहार अर्पण करून कॉंग्रेस च्या राष्ट्रीय सहसमन्वयक मंगलताई भुजबळ व ओबीसी ग्रामीण जिल्हाअध्यक्ष संतोष लोंढे व कार्यकर्ते यांनी अभिवादन केले तसेच आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमास भेटी देऊन भीमसैनिकांना व आंबेडकर प्रेमींना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना कॉंग्रेस च्या राष्ट्रीय सहसमन्वयक मंगलताई भुजबळ म्हणाल्या की,आज समाजातील लहान घटकांच्यावर अन्याय केला जातोय,सगळॆ काही ठीक आहे असे नाही म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अरे “शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा” आम्ही संघर्ष करतोय पण तो आपापसात करतोय हा संघर्ष थांबला पाहिजेत.जो संघर्ष करायचा तो समोरच्या लोकांबरोबर करायचाय जे जातीवाद आणतायत,जे धर्मवाद आणतायत जे अजूनही समानतेच्या रस्त्यावर चालायला तयार नाहीत.जो मनुवाद आणण्याचा प्रयत्न होतोय या देशामधे आणि तो जर रोखायचा असेल तर भीमसैनिकच रोखु शकतात आणि लढू शकतात. यावेळी संजय कांबळे व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.