श्रावण महिना हा सणांचा राजा आहे. या महिन्यात व्रतवैकल्य, पूजा, दान या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. सवाष्णीला हळदी कुंकू लावून तिचे ओटी भरण केले जाते.
सीमेवर जवान लढताना शहीद होतात त्यानंतर जवानांच्या कुटुंबाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या पत्नीला विधवा मानले जाते समाजात तिला वेगवेगळ्या पद्धतीने वागवले जाते याच प्रथेला बाजूला सारून आमच्या प्रशालेत अंबिका नारायण भोंदे या वीर पत्नींचा हळदी कुंकू लावून ओटी भरून सन्मान करण्यात आला. सर्वांसमोर एक अनोखा आदर्श घालून दिला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून वीर पत्नी अंबिका भोंदे व जि. प. शाळा अरणगाव येथील आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या सौ. संगीता विजय कदम या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मुख्याध्यापक विजय कदम सर यांनी मुलांना श्रावणी शुक्रवार चे महत्व समजावून दिले.
वीर पत्नी अंबिका भोंदे यांनी आपल्या मुलाखतीतून सांगितले की आजही आम्ही शहीद जवान नारायण भोंदे यांचा वाढदिवस साजरा करतो देशाची सेवा करताना श्री नारायण भोंदे यांना वीरमरण प्राप्त झाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .आम्हाला समाजात दिलेल्या वागणुकीबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आम्हाला पैसे नको पण मानवतेच्या नात्याने जपा असे त्यांनी सांगितले
सौ संगीता कदम यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. मुलांना आरोग्याचे शिस्तीचे महत्व पटवून दिले. या भारत देशाचे सदृढ नागरिक होण्यासाठी, देशाचे शूर जवान होण्यासाठी योग्य आहार घ्या. पिझ्झा, बर्गर यांसारख्या फास्ट फूडपासून परावृत्त होण्यास सांगितले.
या कार्यक्रमात नातू शार्दुल विद्यार्थ्यांने श्रावणी शुक्रवारची कथा सांगितली .
मुलींनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा कांबळे यांनी केले. पाहुणांचा परिचय सविता शेळके व वैभव वाघ यांनी केला. आभार वैशाली निकम यांनी मानले.






