नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचा बाल विकास प्रकल्प अधिकारी ‘एसीबीच्या’ जाळ्यात

0
3459

तक्रारदार- पुरुष वय- ४० रा -रास्तापूर, ता- नेवासा जि.अहमदनगर
आरोपी – सोपान सदाशिव ढाकणे, वय – ३४, बालविकास प्रकल्प अधिकारी,वर्ग- २, पंचायत समिती , नेवासा.
राहणार-प्लॉट नं ३४, रामविजय हौ.सोसायटी, अलोकनगर, बीड बायपास, औरंगाबाद.
लाचेची मागणी- ५००००/-₹ तडजोडी अंती ₹ ४५०००/-
लाचेची मागणी – ता.२३/०६/२०२२
लाचेचे कारण -.तक्रारदार यांचे चारचाकी वाहन ( कार ) हे भाडेतत्त्वावर बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती नेवासा यांचे कडे लावण्यात आले होते. सदर वाहनाचे बील ₹ १,१४,२६१/- हे मंजूर करुन त्याचा चेक तक्रारदार यांचे बॅंक खात्यामध्ये जमा करण्यासाठी तक्रारदार यांना दिला, त्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचे कडे ₹ ५००००/- ची मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक २३/०६/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक याने पंचासमक्ष ५००००/- ₹ लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ₹ ४५०००/- स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक ०१/०८/२०२२ रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध नेवासा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी लोकसेवक यांस ताब्यात घेतले आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा अधिकारी:- गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
▶️ पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶ सापळा पथक:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, पो अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पो ह. हरुन शेख, राहुल डोळसे.
▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.सचिव,महिला व बालकल्याण विभाग, मंत्रालय मुंबई.