दैव होते बलवत्तर म्हणून वाचले नगरच्या सायकलपटूचे प्राण

0
152

दैव होते बलवत्तर म्हणून वाचले नगरच्या सायकलपटूचे प्राण
जस्मितसिंह वधवाचे दिल्लीला झाले अपघात
मागून कंटेनरने उडविल्याने थोडक्यात बचावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू व 2022 वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा दिल्ली जवळील फरिदाबाद पलवल टोलनाक्याजवळ नुकतेच झालेल्या अपघातामध्ये थोडक्यात बचावला. मागून सुसाट वेगाने आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. दैव होते बलवत्तर म्हणून किरकोळ फ्रॅक्चर होऊन त्याचे प्राण वाचले, या घटनेत सायकलचा पूर्णत: चेंदामेंदा होऊन सायकलपटू वधवा पुढे फेकला गेला.
जस्मितसिंह वधवा याने यावर्षी 1 हजार, 600 व 400 कि.मी. चे प्रत्येकी दोन राऊंड तर 300 व 200 कि.मी. चे प्रत्येकी तीन राऊड पूर्ण केले आहे. पाच दिवसाच्या एस.आर. करीता तो दिल्ली येथे गेला होता. यामध्ये त्याचे 1500 कि.मी. सायकलिंग करण्याचा मानस होता. एस.आर. म्हणजे सुपर रायडिंग ज्या मध्ये दिवस रात्र सायकल चालवावी लागते. 24 तास मध्ये तो फक्त दोन ते चार तास आराम करतो.
पाहिल्या दिवशी 400 कि.मी.च्या राईडला जाताना जस्मितच्या सायकलचे हब तुटले आणि त्या ठिकाणी त्याला माघार घ्यावी लागली. तिसर्या दिवशी 500 कि.मी. च्या राईडवर जस्मितसह अजून तीन सायकलिस्ट होते. फरिदाबाद पलवल येथील टोल नाक्याजवळ अचानक मागून येऊन त्याला कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये चालक धडक देऊन पळून गेला. हा प्रकार रात्री 1 वाजता घडला. त्याठिकाणी त्यांच्या सोबत असलेले दुसरे सायकल स्वाराने आयोजक चिरो मित्रा यांना फोन करुन तात्काळ त्या ठिकाणी पाचारण केले. जस्मित रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत होता आणि सायकलचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. नशिबाने साथ दिल्याने रुग्णवाहिला पाच मिनिटातच उपलब्ध झाली आणि जस्मित दहा मिनिटात पलवल येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी 5 वाजेपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत एकटाच हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्याबरोबर असलेल्या सायकपटूंनी त्याच्या उपचाराच्या सर्व पूर्तता करुन व त्याच्या नातेवाईकांना कळवून पुढील राइडसाठी निघून गेले.
भारतात किमान 30 हजार सायकलिस्ट आहेत, त्यात 22 हजार नोंदणीकृत सायकलिस्ट आहेत. सुरक्षा व्यवस्था सक्षम नसल्याने त्यांचे वारंवार अपघात होत आहे. ज्यावेळेस जस्मितशी त्याच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला, त्यावेळेस त्याला काय घडलं ते आठवतच नव्हते. ज्यावेळी राईड संपल्यावर त्याच्याबरोबर असलेल्या सायकलपटूंनी घडलेला प्रकार सांगितल्याने हकीगत समोर आली. यामध्ये कंटेनरने जस्मितला धडक दिल्यावर तो वीस फूट लांब सायकलवरून फेकला गेला. हेल्मेटचे दोन तुकडे झाले. यामध्ये जस्मितला थोडीशी इजा व पाठीवर एक छोटासा फ्रॅक्चर झाला आहे. जस्मित अहमदनगरला परतला असून, त्याची प्रकृती चांगली आहे.
युरोप, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून भारतात लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच रस्त्यावरची सुरक्षा, रस्त्याची भौगोलिक परिस्थिती आणि रस्त्यावर होणारे अपघात ही पश्‍चिमदेशापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरती सायकलिंग सुरक्षित आहे का? हा विचार करण्याची गरज असल्याचे त्याचे वडिल देवेंद्रसिंह वधवा यांनी भावना व्यक्त केली आहे.

भारतात बी.आर.एम, एस.आर असे अनेक सायकल राईड होतात. सायकलिंग करताना अनेक सायकलपटूंनी जीव गमावला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑडेक्स ही संघटना अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची पाहणी करते, त्यांनी भारताच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वेगळे काही नियम तयार करू शकतात का ? याकडे विचार करण्याची गरज आहे. प्रदुषणमुक्त व आरोग्यासाठी लाभदायी असणार्‍या सायकलिंगसाठी रस्त्यावर वेगळी लाईन केली जाऊ शकते का? यावर विचारमंथनाची गरज आहे. -हरजितसिंह वधवा (सामाजिक कार्यकर्ते)