Ahmednagar News
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत अहमदनगर महानगर पालिकेला महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित केले होते.त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आज ९ जून रोजी दुपारी चार वाजता महापालिका कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गातील नियोजन शून्य व ढिसाळ कारभारामुळे कार्यक्रमाचा अक्षरशा फज्जा उडाला चार वाजता सुरू होणार्या कार्यक्रमाकडे आयुक्त, उपायुक्त, इंजि. कुणीही अक्षरशा फिरकले नाही. कर्मचाऱ्यांची कमी उपस्थिती नगरकरांच्या सहकार्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिकेला राज्य सरकारने सन्मानित केले. परंतु महानगर पालिका प्रशासनाला कुठलाही अभिमान वाटत नसल्यामुळे मी ४.४५ वाजता या कार्यक्रमातून उठून गेलो आहे. नगर शहराच्या अभिमानात भर घालणारा पुरस्कार मिळाला असतानाही पालिका प्रशासनामध्ये कुठलाही उत्साह दिसत नाही. त्यामुळे मी प्रशासनाचा निषेध व्यक्त करतो अशी भावना उपमहापौर गणेश भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.






