बेकायदेशीररित्या जमीनीवर ताबा घेणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्या – आ. संग्राम जगताप

0
29

नगर : तक्रारदारांच्या पिढीजात शेतजमीनी असून त्याचे सर्व महसुली कागदपत्रे हे त्यांच्या नावाने आजही नोंदणीकृत आहेत, परंतु काही अज्ञात विशिष्ट लोकांनी तक्रारदारांच्या जमीनीवर पाल ठोकून ताबा घेतला आहे. वास्तविक पाहता विशिष्ट लोकांचा त्या क्षेत्राशी काही एक संबंध नसून लोकांनी कोणाच्या तरी सांगण्यावरुन किंवा स्वखुशीने हे ताबा मारण्याचे कृत्य केले असावे, असे तक्रारदारांकडून कळते. तरी सदर क्षेत्रामध्ये सदर समाजाचे लोक हे तक्रारदारांना जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने व सदर क्षेत्रावर ताबा घेण्याच्या हेतून बेकायदेशीर रित्या शिरकाव करून त्यांच्या शेतजमीनीचे नुकसान करुन तेथे राहत आहेत. अभय श्रीश्रीमाळ, जीवन कटारिया, पोपटलाल कटारिया, राहुल कटारिया, बाळासाहेब पठारे, जितेंद्र पोरवाल यांच्या जागेवर काहींनी बेकायदा अधिकार गाजवला आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून तक्रार करत कारवाईची मागणी करण्यात आली आहे अज्ञात विशिष्ट समाजाचे लोकांनी तक्रारदारांच्या क्षेत्रामध्ये बळजबरीने अश्लील भाषा वापरून शिवीगाळ, दमदाटी, जीवेमारण्याच्या धमक्या देऊन बुरुडगाव व दौड रोड भागातील जमिनीवर बेकायदेशीर ताबा घेतला असून त्या पाठीमागची मुख्य सूत्रधार कोण आहे याचाही तपास करावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी अभय श्रीश्रीमाळ, जीवन कटारिया, पोपटलाल कटारिया, राहुल कटारिया, बाळासाहेब पठारे, जितेंद्र पोरवाल उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी शिष्ट मंडळास सांगितले की, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, कोतवाली पोलीस स्टेशन व नगर तालुका पोलीस स्टेशन यांना सूचना देत कडक कारवाईचे आदेश दिले.