महापालिका कर्मचारी कृती समिती आक्रमक,आ.राणेंवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा

0
23

अ. नगर-काल आमदार नितेश राणे हे अहमदनगर दौऱ्यावर आले असता शहरातील कापड बाजार येथे त्यांनी चौक सभा घेतली या चौक सभेदरम्यान मनपा आयुक्त पंकज जावळे यांना भाषणाच्या माध्यमातून शिवीगाळ केली सार्वजनिक ठिकाणी त्यांचा अपमान केला त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर ॲट्रॉसिटी कायदा नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आज बुधवारी अहमदनगर महापालिका कर्मचारी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक यादव यांना दिले. यावेळी कृती समितीचे सर्व सदस्य यांनी मनपा आयुक्त जावळे साहेब यांची भेट घेऊन त्यांना जे सभेदरम्यान अपमानित शब्द वापरण्यात आले त्याबद्दल कृती समितीने त्यांना या झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून कृती समिती आपल्या पाठीशी आहे पुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

असे यावेळी सांगण्यात आले व बाहेरील आमदाराने शहरात येऊन जे आयुक्त साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा यावेळी निषेध करण्यात आला तसेच कृती समितीच्या मार्फत मनपा आयुक्त कार्यालयातून कोतवाली पोलीस स्टेशन येथे येऊन कृती समितीने कोतवाली पोलीस निरीक्षक यादव यांची भेट घेऊन झालेला प्रकार हा निंदनीय आहे आयुक्त साहेबांना जातीवादी शब्द वापरल्याबद्दल या आमदाराच्या वक्तव्याचा यावेळी चर्चेतून ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी चर्चा झाली यावेळी कृती समितीचे अनिल शेकटकर यांनी सांगितले की काल जो प्रकार नगर शहरात भरलेले चौक सभेमध्ये आयपीएस दर्जाच्या व मोठ्या परीक्षा पास करून आज आयुक्त साहेब या पदावर पोहोचले त्यांना जे अपशब्द व जातीय वाचक हीन दर्जा लेखून जे शिवीगाळ करण्यात आली त्याबद्दल आम्ही अहमदनगर कर्मचारी कृती समितीच्या वतीने निषेध नोंदवत आहोत,
तसेच भगवान जगताप यांनी सांगितले की हा झालेला प्रकार नगर शहराची शांतता भंग करण्याचा प्रकार आहे व दंगल घडून आणण्याचा प्रकार आहे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आहे ही गोष्ट निंदनीय आहे आयुक्त साहेबांना ज्या प्रकारे शिवीगाळ करण्यात आली ती गोष्ट म्हणजे आज प्रशासनाचा अधिकारी या नात्याने त्यांना सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात परंतु कुठलाही निर्णय घेतला तर एक बाजूचे माणसं दुखावले जातात असे असताना आमदार साहेबांनी असे वक्तव्य करणे म्हणजे एका समाजास हीन वागणूक देऊन अपमानित करणे तरी या विरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा असे सांगितले, सुनिता चव्हाण यांनी सांगितले की आयुक्त साहेब हे नगर शहरात खूप सुंदर काम करतात असे असताना त्यांना आरिरावेचे भाषा करणे म्हणजे नगर शहराचे चांगला चाललेला कारभार यामध्ये व्यत्यय आणण्याचाच काम आहे यावेळी कांतीलाल जावळे, विनोद घोरपडे, गणेश शेकटकर, गणेश पठारे, सुनिता चॊव्हाण, लखन गाडे, शरद भालेराव आदी उपस्थितीत होते.