भाजप आमदार नितेश राणे यांचा.. आ. जगताप यांना अप्रत्यक्ष इशारा ?

0
26

नगर शहरातील अत्याचाराला स्थानिक आमदार जबाबदार आहेत, ते जिहादींच्या कारवायांना खतपाणी घालतात. हिंदूंनी त्यांचे काय दुखावले आहे? त्यांना मतदान करणारे हिंदूच आहेत, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा भाजप आमदार राणे यांनी राष्ट्रवादी आ. संग्राम जगताप यांचे नाव घेऊन दिला.
कापडबाजारातील सभेत बोलताना आ. राणे यांनी मनपा आयुक्त व पोलिसांचा अतिशय शिवराळ भाषेत उल्लेख केला. यापूर्वी आपण नगरमध्ये आलो होतो, परंतु परिस्थिती सुधारली नाही. आणखी वाईट होत चालली आहे. जिहादींची हिंमत वाढते आहे, परंतु आता सरकार बदलले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहिले नाहीत आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ राहिले नाहीत हे अधिकार्‍यांनी लक्षात ठेवावे. कोण अधिकारी त्यांना वाचवतात, त्यांच्यासाठी मस्ती करतात, त्यांच्या ड्युट्या कोण वाचवतो, हे मी पाहतो. मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. माझ्या वाटेला जाऊ नका, आधी माझी बॅकग्राऊंड तपासा, मग समोर या. व्यापार्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी आता आमची आहे. त्यांच्याकडे वाकडे नजरेने बघाल तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही. तुमचे इथले आमदारही तुम्हाला वाचवायला येणार का? 2024 जवळच आहे. या आमदारांचा एकदाच कार्यक्रम करून टाका. हिंदूंची ताकद दाखवून द्या, असेही आवाहन आ. राणे यांनी केले.