अहमदनगर-ओंकार भागानगरे खून प्रकरणात गणेश हुच्चे (वय 39), नंदू बोराटे (वय 40, दोन्ही रा. ब्राम्हण गल्ली, माळीवाडा), अनिकेत साळुंके (रा. नगर) या तिघांना अटक करण्यात आले आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता, तीन दिवसांची (दि. 27) पोलिस कोठडी देण्यात आली.
ओंकार भागानगरे याचेवर तलवारीने वार करुन खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील गणेश केरुप्पा हुच्चे व नंदू लक्ष्मण बोराटे याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांना अनिकेत साळुंके याने मदत केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ही अटक केली. या तिघांना शनिवारी (दि. 24) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी मधुकर साळवे या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, वाहने जप्त करणे तसेच त्यांना आणखी कोणी-कोणी मदत केली आहे. खुनाचा सूत्रधार आणखी कोणी आहे का ? याचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली.
आरोपींच्या वतीने अॅड. महेश तवले आणि अॅड. संजय दुशिंग, भागानगरे खुनातील तिघांना पोलिस कोठडी अॅड. विक्रम शिंदे यांनी काम पाहिले. या गुन्ह्यातील तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. फक्त वाहने जप्त करावयाची आहेत. या गुन्ह्यातील अन्य आरोपींना ही अटक करण्यात आले आहे. त्यामुळे जादा पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. तिन्ही आरोपींना कमीत-कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.