दिल्ली गेट येथे पाकिस्तानचा झेंडा जाळून हिंदुत्ववादी तरुणांचे आंदोलन
पाकिस्तान मध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाबाबत निषेध
अहमदनगर – नुकतेच पाकिस्तान मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एका व्यक्तीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत बळजबरी लग्न केले व कुटुंबीयांना धमकवण्यात आले आहे या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे असे अनेक प्रकार पाकिस्तान मध्ये हिंदू कुटुंबियांसमवेत होत आहे असा आरोप करत आज गुरुवारी अहमदनगर मध्ये दिल्लीगेट येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या संपूर्ण घटनांचा निषेध नोंदवत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला तर दिल्ली येथील पाकिस्तान दूतावासाला या संपूर्ण प्रकरणाचा जाब विचारावा अशी मागणी हिंदुत्ववादी तरुणांच्या वतीने करण्यात आली यावेळी उत्कर्ष गीते, निल गांधी, अभि भावरे, वैभव सलगरे, अनिकेत बोंडगे, उत्कर्ष अग्रवाल, निखिल गांधी आदी उपस्थिती होते.