Monday, May 20, 2024

सुजित झावरेंना मंत्री विखेंची ‘गॅरंटी’…पारनेर विधानसभेबाबत दिले संकेत…

सुजितराव तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पहा : नामदार राधाकृष्ण विखे पाटील

जनतेच्या साक्षीने नामदार विखेंचा सुजित पाटलांना शब्द

टाकळी ढोकेश्वर येथे खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मेळावा

सुजितराव आता कंबर कसा उद्याचा दिवस तुमचा आहे. हातपाय आखडायचे नाही. उतरायचं तर पूर्ण ताकतीने तुमच्या मागे संपूर्ण ताकद उभी करायला मी तयार आहे. हे मी तुम्हाला जनतेच्या साक्षीने सांगतो. उद्या कोणीतरी वरचे साहेब येतील, पुण्याचे येतील सुजितरावांना बोलून घेतील तू काळजी करू नको मी तुझं बरोबर करतो मग तुमचा पूर्ण कार्यक्रम झाला समजायचं, तुम्हाला संभाळणारच नाही. स्वर्गीय वसंतराव झावरे पाटलांचा त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी वापर केला. तुमचाही वापर केला, पण तुम्ही आता शहाणे झाला, बरंय गेले नाही तिकडं तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करून पाहिली तुम्ही आमच्याशी दोस्ती करून पहा असे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील टाकळी ढोकेश्वर येथे पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील मित्र मंडळ व देवकृपा फाउंडेशनच्या वतीने भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या आयोजित प्रचार सभे मध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी आहे. मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. पारनेर तालुक्यात अनेक समस्या आहेत. पिंपळगाव जोग्याचे हक्काचे पाणी मिळाली पाहिजे. कान्हूर पठार उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुढील काळात तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सुपा एमआयडीसी मध्ये भूमिपुत्रांना रोजगार मिळून देण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील राहणार असल्याचे मंत्री विखे यांनी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील यांनी आम्ही सर्व ताकतीने खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठीमागे उभे असून पारनेर तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे सांगितले. तसेच पुणे जिल्ह्याचे नेते मंगलदास बांदल यांचेही यावेळी भाषण झाले त्यांनी चौफेर टीका केली.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये खासदार डॉ. सुजय विखे व माजी आमदार निलेश लंके हे या निवडणुकीला एकमेकांसमोर सामोरे जाणार आहेत. निलेश लंके हे पारनेरचे भूमिपुत्र असल्याने विखे यांनी पारनेर तालुक्यात लंकेना रोखण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. तालुक्यात ठीक ठिकाणी प्रचार सभा व बैठकांना सध्या मोठा जोर आला आहे. या सभांना होणारी उच्चांकी गर्दी ही राजकीय जाणकारांच्या भुवया उंचवायला लावणारी आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने टाकळी ढोकेश्वर येथील कटारिया मंगल कार्यालयामध्ये भाजपचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रचार बैठक पारनेर तालुक्याचे नेते सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पाच ते सहा हजार लोकांची उपस्थिती होती.
मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सुजित झावरे पाटील यांच्या वतीने टाकळी ढोकेश्वर मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले त्यांची टाकळी ढोकेश्वर गावातून ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिश बाजीत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.यावेळी कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ नेते सिताराम खिलारी, पुणे जिल्ह्याचे नेते मंगलदास बांदल, ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, अण्णासाहेब बाचकर, मा. सभापती बाबासाहेब तांबे, पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, मा. सभापती गणेश शेळके, युवा नेते सचिन वराळ पाटील, मा. सभापती अरुण ठाणगे, ज्येष्ठ नेते निजाम पटेल, पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष विक्रम कळमकर, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, शहाजी कवडे, ढवळपुरी उपसरपंच बबन पवार, मनसे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी, योगेश रोकडे, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, डॉ. भाऊसाहेब खिलारी, डॉ. किशोर ढोकळे, पारनेर नगरसेवक युवराज पठारे, पंचायत समिती सदस्या सुप्रिया अमोल साळवे, सतीश पिंपरकर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे, आदी मान्यवर व सुजित झावरे पाटील मित्र मंडळ देवकृपा फाउंडेशनचे पदाधिकारी पारनेर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच युवक महिला व आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने टाकळी ढोकेश्वर येथे उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles