आ.लंके, खा.विखे जिल्हाधिकारी कार्यालयात आमने सामने…लंके समर्थकांची जोरदार घोषणाबाजी..व्हिडिओ

0
34

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके आमने-सामने आले. त्यावेळी लंके समर्थकांकडून ‘निलेश लंके भावी खासदार’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात सातत्याने आक्रमकपणे भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे. निलेश लंकेंच्या भूमिकेवर खासदार विखे जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण असतानाच आज कार्यकर्त्यांनी विखेंसमोरच घोषणाबाजी केली आहे.
लेटसअप मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे.