एकाच दिवसात सलग सोळा तास काम करत 1100 पेक्षा जास्त नवीन खाते उघडण्याचा विक्रम

0
1133

एकाच दिवसात सलग सोळा तास काम करत 1100 पेक्षा जास्त नवीन खाते उघडण्याचा विक्रम

मिशन 50000 अंतर्गत केडगाव पोस्ट ऑफिसचे विक्रमी कामकाज

केडगाव:भारतीय डाक विभाग अहमदनगरच्या वतीने दि 1 मे ते 31 मे 2022 च्या दरम्यान मिशन 50000 अंतर्गत पोस्टऑफिस मधील विविध योजनेचे नवीन अकाउंट उघडण्याचे मोहीम सुरू असून त्या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून दि 27 मे रोजी केडगाव पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यानी सलग 16 तास काम करून 1100 पेक्षा जास्त नवीन अकाउंट उघडत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
नुकताच बारामती प्रधान डाकघरमध्ये एकाच दिवसात 621 तर अहमदनगर प्रधान डाकघर मध्ये 1116 नवीन अकाउंट उघडत विक्रमी कामकाज करण्यात आले होते, या दोन्हीही ऑफिसचा आदर्श समोर ठेवत, अहमदनगर आर एस (केडगाव) पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी 1100 पेक्षा जास्त नवीन अकाउंट उघडवत विक्रम प्रस्थापित केला.
या कामी श्री एस. राम कृष्णा वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप हदगल, सहायक डाक अधिक्षक, पश्चिम उपविभाग अहमदनगर यांचे नियोजनात या मोहिमेची मागील तीन दिवसांपासून तयारी सुरू होती.
त्याकरिता केडगाव मधील कार्यरत असणाऱ्या महिला प्रधान अभिकर्ते व ग्रामीण डाक सेवक यांची मिटिंग घेऊन त्याना मिशनबदल सविस्तरपणे माहिती देण्यात आली. सर्वानी सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या परिसरातील नागरिकांची नवीन खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडत पोस्टाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यात हे मिशन अतिशय प्रभावी ठरले.
केडगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर श्री संतोष यादव यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन अत्यंत नियोजनबद्ध राबविण्यात आले. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे सलग 16 तास ते त्याच्या सहकाऱ्यांसोबत कार्यरत राहिले त्यामुळेच हे अशक्य काम शक्य होऊ शकले, याकामी त्याना सर्व ग्रामीण डाकसेवक,पोस्टमन बांधव,व महिला प्रधान अभिकर्ते यांचे विशेष सहकार्य मिळाले.
मिशन 50000 मध्ये एकाच दिवशी विक्रमी कामकाज केल्याने मा श्री राम कृष्णा व श्री संदीप हदगल यांनी सायंकाळी 6 वाजता केडगाव पोस्ट ऑफिसला भेट देऊन पोस्टमास्तर श्री संतोष यादव व त्याच्या सर्व सहकाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा छोटेखानी कार्यक्रमात विशेष गौरव केला.
ही मोहीमेत श्रीमती शुभांगी मांडगे, श्रीमती सविता ताकपेरे यांचे सह श्री बाबासाहेब बुट्टे, श्री अनिल धनावत ,श्री अंबादास सुद्रीक,श्री स्वप्नील पवार,श्री शिवाजी कांबळे,श्री संजीव पवार, भाऊ श्रीमंदिलकर ,श्री गहिनीनाथ पालवे,श्रीमती संगीता शर्मा,श्री झावरे सर,श्रीमती कुसुम हरिदास रोहकले, श्रीमती ज्योती जवक,श्रीमती रंजना काळे,श्रीमती रंजना वाघ,श्रीमती ताराबाई पवार,श्रीमती सुनिता लकाळ, पंकजा धर्म,रेवती शेटे,लता कोरे,अंजली जोशी,अस्मिता दिलीप कुलकर्णी, नीता चौधरी यांनी सहभाग घेतला.

या मिशन मध्ये विक्रमी कामकाज झाल्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या आनंदाने निश्चितच भारावून गेलो. यापुढेही असेच कामकाज करत पोस्टाच्या विविध योजना लोकाभिमुख करण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील.

संतोष यादव
पोस्टमास्तर
केडगाव

यामिशन मध्ये केडगाव पोस्ट ऑफिसने अत्यंत प्रभावी काम केले, हे अहमदनगर विभागासाठी अभिमानस्पद बाब आहे. एका दिवसात ११०० पेक्षा जास्त खाती उघडून केडगाव पोस्ट ऑफिस ने एक विक्रम स्थापित केला आहे. इतक्या कमी कर्मचारी संख्येमध्ये हा विक्रम मोडणे अत्यंत कठीण आहे.

श्री एस राम कृष्णा
वरिष्ठ अधीक्षक डाकघर
अहमदनगर विभाग