भविष्यातील संधी व स्वतःच्या क्षमता ओळखून करिअर निवडावे, प्रा.संजय कारले

0
31

भविष्यातील संधी व स्वतःच्या क्षमता ओळखून करिअर निवडावे 

राहुरीविद्यापीठ –   प्रतिनिधी,

 देवराज मंतोडे यास कडून. 

      शालेय शिक्षण घेत असताना  आपल्या मधील क्षमता व भविष्यातील संधी समजल्या तर आपणास आवडीचे करिअर करून भविष्य उज्ज्वल करता येइल.दहावी, बारावीचे वर्ष आयुष्याला वळण देणारे आहे  अकरावी पासूनच नियोजनबद्ध अभ्यास करून  विविध स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये निश्चितपणे यश मिळवता येईल असे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ तथा करिअर समुपदेशक प्रा.संजय कारले यांनी  मार्गदर्शन  केले.

    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयाच्या वतीने दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ .महानंद माने होते ,ते विचार मांडताना म्हणाले की  विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वाच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होइल ,विद्यार्थ्यांनी आरोग्यावर लक्ष देऊन व्यायाम व खेळ ही महत्त्वाचे आहेत तसेच जीवनातले चांगले मूल्य अंगीकारणे आवश्यक आहे. आपल्याला निश्चितच चांगले यश प्राप्त होईल असे प्रतिपादन डॉ. महानंद माने यांनी केले.याप्रसंगी माजी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शासन कृषी विभागाचे  अव्वर सचिव उमेश चांदवडे ,प्रा जितेंद्र मेटकर,  माजी पंचायत समिती सदस्य सचिन भिंगारदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे खजिनदार महेश घाडगे संचालक राजीव राठोड, पुणे येथील उद्योजक  माजी विद्यार्थी संग्राम साळुंखे सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम च्या  प्राचार्या योगिता आठरे आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण तुपविहीरे यांनी केले सूत्रसंचालन हलीम शेख तर उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करिता विद्यालयाचे क्रीडा शिक्षक घनश्याम सानप ,एनसीसी अधिकारी संतोष जाधव ,संदीप जाधव, यांनी विशेष परिश्रम घेतले