प्रवेशद्वाराच्या माध्यमातून सावित्रीबाईंचे विचार युवा पिढीला प्रेरणा देत राहील – आ. संग्राम जगताप
नगर : महापुरुषांचे विचार जयंती, पुण्यतिथी पुरते न ठेवता त्यांचे विचार प्रत्येकाने सदैव आत्मसात करून समाजामध्ये वाटचाल करावी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असल्यामुळे आज महिला उच्च स्थानापर्यंत पोहोचू शकल्या आहे. राजकारणामध्ये चांगले काम करीत असताना विरोध तर होतच असतो, त्याच्याकडे कानाडोळा करून सर्वांना बरोबर घेऊन विकासाची संकल्पना शहरांमध्ये राबवली आहे, प्रत्येक समाजाला साक्षर करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले आहे. कुटुंबातील स्त्री साक्षर असेल तर आपले संपूर्ण कुटुंब साक्षर होईल प्रवेशद्वाराच्या माध्यमातून सावित्रीबाईंचे विचार आजच्या युवा पिढीसमोर प्रेरणा देत राहील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे समाजामध्ये काम करीत असताना त्यांना देखील मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता मात्र त्यांनी न डगमगता समाजासाठी मोठे कार्य उभा केले आहे किशोर डागवाले यांनी सकल माळी समाज ट्रस्ट अहमदनगरच्या माध्यमातून समाजाला एकत्र करण्याचे काम केले आहे चांगल्या कामासाठी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करू असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सारसनगर भागाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर नामकरण सोहळ्यानिमित्त प्रवेशद्वाराचे भूमिपूजन शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती देवस्थानचे पुजारी संगम नाथ महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, मनपा महिला बालकल्याण समिती उपसभापती मीना चोपडा, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी स्थायी समिती सभापती किशोर डागवाले, सुवर्णा जाधव, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, धनंजय जाधव, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, प्रा. माणिकराव विधाते, संजय चोपडा, दत्ता गाडळकर, बाळासाहेब भुजबळ, अंबादास गारुडकर, प्रकाश इंगळे, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, अजय अवसरकर, रामदास कानडे, बाळासाहेब विधाते, शिवाजी विधाते, राजू एकाडे, आण्णा चौधरी, गजानन ससाणे, जालिंदर बोरुडे, मनीष साठे, अर्जुन बोरुडे, विश्वनाथ राऊत, सुरेश आंबेकर, अभिषेक चिपाडे, राहुल रासकर, मळू गाडळकर, मंत्री पांडुळे, तात्यासाहेब दरेकर, राजू चौरे, सचिन गुलदगड, विजय चौरे, मनसेचे नितीन भूतारे, अमित खामकर आदीसह सकल माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किशोर डागवाले म्हणाले की, सकल माळी समाज एकत्र आणून प्रलंबित विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. आमदार संग्राम जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असता त्यांनी तातडीने मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे सारसनगर भागाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर नामकरण सोहळ्यानिमित्त प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्याचे ठरविले. त्यानुसार आज संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सोहळा संपन्न झाला आहे. याचबरोबर समाजाला एकत्रित येण्यासाठी व विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी जागेची मागणी केली आहे लवकरच ती मागणी पूर्ण होईल सर्वांनी एकत्र येऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावावे असे ते म्हणाले.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, प्रभाग १४ मधील महात्मा फुले चौकात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार उभारले जाईल, व यामुळे शहराच्या वैभवात भर पडेल, समाजासाठी लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर प्रा. माणिकराव विधाते आदींची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.