शिवसेना नाव,धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, नगरमध्ये जल्लोष..

0
26

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह दिल्याने या निर्णयाचे पक्षातील स्थानिक कार्यकत्यांनी स्वागत करत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. ठाकरे गटाच्या पदाधिकान्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर शहरातील कोंड्यामामा चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करत शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकत्यांनी जल्लोष केला. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील इतर शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे तालुक्यातील शिंदे गटाच्या चिन्ह असलेले भगवे झेंडे हातात पदाधिकारी, घेऊन ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत यावेळी कार्यकत्यांनी जल्लोष केले