नगर – जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवचैतन्य व तोच विचारांचा झंझावात घेऊन जनसामान्यांमध्ये कार्य करत आहे. पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने नव्याने पक्ष बांधणी सुरु झालेली असून, सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेऊन सामाजिक बांधिलकीने प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) मध्यवर्ती जिल्हा पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गुरुवार दि.9 फेब्रुवारी रोजी असलेला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याच्या नियोजनार्थ जिल्ह्यातील पदाधिकार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. याप्रसंगी राज्य प्रवक्ते संजीव भोर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव, बाबुशेठ टायरवाले, बंडू रोहोकले आदींसह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना (बाळासाहेबांची) पक्षातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे:- दलित आघाडी प्रमुख- पोपटराव पाथरे, युवा सेना नगर उपतालुका प्रमुख- सचिन ठोंबरे, उपशहर प्रमुख- आनंद वाळके, युवा सेना उपशहर प्रमुख- अक्षय शिंगवी, प्रसिध्दी प्रमुख- प्रल्हाद जोशी, युवा सेना जिल्हाप्रमुख (शेवगाव-पाथर्डी)- साईनाथ आधाट, जिल्हा संघटक (राहुरी, शेवगाव, पाथर्डी)- अमोल हुबे, युवा सेना शहर प्रमुख- महेश लोंढे, उपजिल्हाप्रमुख (शेवगाव)- दिलीप भागवत, युवा सेना जिल्हा प्रमुख- आकाश कातोरे, कर्जत तालुका प्रमुख- बापूसाहेब नेटके, श्रीगोंदा उपजिल्हाप्रमुख- संतोष इथापे, श्रीगोंदा युवा सेना शहरप्रमुख- संदीप गोविंद भोईटे , जामखेड युवा सेना तालुकाप्रमुख- सुमित वराट , जामखेड शहर प्रमुख- देविदास भादलकर, युवा सेना कर्जत तालुका प्रमुख-सोमनाथ शिंदे, युवा सेना तालुका प्रमुख (श्रीगोंदा-कर्जत)- अभिषेक भोसले, युवा सेना जिल्हाप्रमुख (पारनेर, राहुरी) योगेश गलांडे, नगर तालुका उपजिल्हाप्रमुख आनंद शेळके, उपशहर प्रमुख- राजू कोंडके.






