नाट्य संकुलनाचे काम तातडीने मार्गी लागावे , नाट्य कलाकार यांचे उपोषण

0
25

नगर – नगरकरांचे हक्काचे थेटर असावे यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून नाट्य रंग कर्मी पाठपुरावा,आंदोलने करत आहे. मात्र आजतागायत नाट्य संकुलनाचे काम पूर्ण झाले नाही. आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडून नाट्य संकुलनाच्या कामासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. निधी असूनही नाट्य संकुलनाचे काम पूर्ण होत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या मधील विसंगतीमुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. जोपर्यंत कामाला गती देत नाही तोपर्यंत रंगकर्मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपोषणावर ठाम आहे. नाटकातून कलाकार घडत जातो त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येते ही दुर्दैवी बाब आहे. तरी सावडी नाट्य संकुलनाचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी उपोषण सुरू केले असल्याचे माहिती राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे यांनी दिली.

सावडी नाट्य संकुलनाचे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी मनपा कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रंगकर्मी यांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, श्रेणिक शिंगवी, नितीन लिगडे, क्षितिज झावरे, निनाद बेडेकर, स्वप्निल मुनोत, राहुल सुराणा, नाना मोरे, आयुब खान, महेश काळे, इंजिनीयर केतन क्षीरसागर, पवन नाईक, सुमित कुलकर्णी, जालिंदर शिंदे, श्याम शिंदे, किरण दीडवाणी, पुष्कर तांबोळी, अभिजीत दळवी, सतीश शिंगटे, मंदार अडगटला, एडवोकेट गजेंद्र दांगट, अनंत रिसे, सोमनाथ तांबे, अभिजीत खरपुडे, महेंद्र कवडे, श्री बोठे, निलेश घुले, सुशांत डोईफोडे आदी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी नाट्यकर्मी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन सांगितले की नाट्यसंकुलनाचे काम 19 जून रोजी सुरू केले जाईल. याचबरोबर उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करून दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी बैठक घेतली जाईल. डिसेंबर अखेर नाट्यसंकुलनाचे काम पूर्ण केले जाईल. असे ते म्हणाले