जनतेच्या मनातील मुख्यमंत्री…पुण्यात अजित पवारांच्या बॅनरमुळे पुन्हा चर्चांना उधाण

0
20

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पुण्यात एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी हे विधान केले आहे. यामुळे राज्यात राजकीय भूकंपाच्या चर्चा खऱ्या ठरणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील कोथरूडमध्ये लागलेल्या बॅनर्समुळे या चर्चांना उधाण आलं आहे.अजितदादा हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे बॅनर्स पुण्यात झळकले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजित पवार… असं बॅनरवर लिहिले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या दिपाली संतोष डोख यांनी हे बॅनर्स लावले असून त्यावर त्यांचाही फोटो आहे.