सुप्रिया सुळे ,प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष झाले; अजितदादा काही न बोलताच निघाले!

0
22

राष्ट्रवादीच्या आजच्या २५ व्या वर्धापनदिनावेळी शरद पवारांनी मोठी घोषणा केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केले आहे. ही घोषणा पवारांनी अजित पवार व्यासपीठावर असतानाच केली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र अजित पवारांकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारांच्या या घोषणेवेळी अजित पवार दिल्लीत उपस्थित होते. घोषणेनंतर अजित पवारांशी एबीपी माझाने बोलण्याचा प्रयत्न केला. पण वर्धपानदिनाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या ढोल ताशांच्या आवाजामुळे काही ऐकू येत नाही, असे खुणवत अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.