उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुलेवाड्यात अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावर भाष्य केले.
राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत अजित पवार यांनी त्यांचे मत मांडले. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिलं आहे. त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. महायुतीला याचा नक्कीच फायदा होईल. राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे, असे पवार म्हणाले.






