महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे. अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. उद्धव ठाकरेंच्या काळात मुख्यमंत्री आम्हाला सांगायचे की करोनाचा कोणताही आकडा लपवायचा नाही. जे घडेल, ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डीवायपाटील, टाटा रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण आहेत”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
आधी संख्या खूप मोठी होती. नंतर अफवा सुरू झाल्या. कुणी म्हणत होतं २०पर्यंत आकडा गेलाय. काही म्हणत होते शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही तिथे महिला-पुरुषांशी बोललो, तेव्हा बहुतेकजण रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, पुण्यातील लोणावळा या भागातले दिसले. त्यांनी सांगितलं की आमच्या पोटात काहीच नव्हतं. काही म्हणाले आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्रता अतिशय जास्त होती. कार्यक्रम संपल्यानंतर थोडी चेंगराचेंगरी झाल्याचंही काहीजण सांगतायत. काहींना नंतर काय झालं माहिती नाही. दवाखान्यात आणल्यानंतरच त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, असंही अजित पवार म्हणाले.