अजितदादांच्या शिंदे फडणवीस सरकारमधील एन्ट्रीनं शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा जोर धरु लागली असतानाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीदि खळबळजनक विधान केलं आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मिटकरी म्हणाले, अजितदादाच २०२३मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. आता चर्चा नाही तर ते खरंच आहे. आणि त्यांच्याबाबतच्या अनेक चर्चा बऱ्यापैकी या खऱ्या ठरतात. आणि अजित पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यांचे आशीर्वाद असतील तर ते नक्कीच मुख्यमंत्री होतील.






