उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. अजित पवार यांच्या बंडाला २१ दिवस झाले आहेत. अशात आज अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशाही शुभेच्छा देणारे बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर लवकरच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील या आशयाचं ट्वीटही केलं आहे. या सगळ्यात रोहित पवार यांनी एका मुलाखतीत अजित पवार यांच्याबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे. २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाचा What’s App ग्रुपही सोडला आहे का? या प्रश्नाचं उत्तर रोहित पवारांनी दिलं आ
अजित पवार कुटुंबाच्या What’s App ग्रुपमधून बाहेर पडले आहेत का? यावर रोहित पवार म्हणाले, “दादा What’s अपवर नाहीत. त्यामुळे दादा किंवा साहेब (शरद पवार) हे What’s अपवर नाहीत आम्ही सगळे जण आहोत. त्यामुळे त्यांनी लेफ्ट होण्याचा प्रश्न येत नाही. ” असं रोहित पवार यांनी ‘खास रे’ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तसंच अजित पवारांच्या बंडामागे भाजपा आहे असंही त्यांनी म्हटलं आ