संजय राऊत यांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या घडीला आम्ही तिघं एकत्र आल्याशिवाय भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही, म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊतच म्हणायचे आमची आघाडी 25 वर्ष टिकणार आहे, असं आम्ही ऐकलं. त्यावेळेस त्यांना 25 वर्ष टिकावी असं वाटत असेल. आता त्यांना आपलं एकट्याचं सरकार यावं असं वाटत असेल. त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? असं अजित पवार म्हणाले.