महायुतीत मिठाचा खडा…अजित पवार गटाचा भाजप उमेदवाराला इशारा, निवडणुकित किंमत चुकवावी लागेल

0
13

नवनीत राणा यांच्या सभेसाठी अमरावतीमधील सायन्सकोर मैदानावर उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोठा डिजिटल फ्लेक्स दिसून येत आहे. या फ्लेक्सवर अमित शाह यांची जाहीर सभा असा आशय लिहिला आहे. मात्र, फ्लेक्सवर दिसत असलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार नवनीत राणा एका बाजुला आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या बाजुला दिसत आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी सभा असतानाही या फ्लेक्सवर अजित पवारांचा फोटो नाही, त्यामुळे अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त करत महायुतीची आठवण करुन दिली आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन येथील सभामंडपाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी थेट नवनीत राणांना इशाराही दिला आहे. ”नवनीत राणाजी आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल.”, अशा शब्दात अमोल मिटकरींनी राणा यांना इशारा दिला आहे. https://x.com/amolmitkari22/status/1783010583153185193