व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही मजेशीर व्हिडीओंचा समावेश असतो तर काही आश्चर्यचकीत करणारे. मात्र, सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुमचं मनोरंजन तर होणार आहेच, पण तुम्हाला आश्चर्याचा धक्कादेखील बसणार आहे. हो कारण आजपर्यंत तुम्ही गाण्याच्या तालावर फक्त घोड्यांना नाचताना पाहिलं असेल पण या व्हिडीओमध्ये चक्क एक उंट घोड्यासारखे पायवर करून नाचताना दिसत आहे.
उंटाला अशा प्रकारे नाचताना पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, कारण उंट फक्त नातच नाही तर खाटेवर ठेवलेल्या आणखी एका खाटेवर चढून तो घोड्यासारखे पायवर करताना दिसत आहे. आतापर्यंत लग्नसमारंभात घोड्यांना पाय वर करुन नाचताना पाहिली आहे, पण या व्हिडिओमध्ये उंटाला घोड्यासारखं नाचताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.