भाजपचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्रदिनी मुंबईत झालेल्या बुस्टरडोस सभेत शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला. मशिदीवरील भोंगे हटवायचे तर फाटली अन् म्हणे आम्ही बाबरी मशीद पाडली, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याला शिवसेनेकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले असून आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबुकपेजवरून फडणवीस यांचा एक फोटो शेअर करत चिमटा काढला आहे.
मोर्चामध्ये पोलिसांकडून लाठीमार होत असतांना फडणवीस हे पळून जातांनाचे जुने छायाचित्र पोस्ट करत दानवे यांनी ` लाठी चार्ज झाला की पळून जाणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो `, असे म्हणत खिल्ली उडवली आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=545606856923372&id=100044221879909