आ. सत्यजित तांबे यांची नगर शहरात एंट्री…. मनपाच्या ‘या’ उपक्रमासाठी आणला ५५ लाखांचा निधी

0
23

अहमदनगर महापालिकेच्या वतीने नगर शहरातील सावेडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचे बांधकाम झाले, मात्र ते केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणारे हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणे खूप गरजेचे होते. त्यामुळे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी मी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.

या निधीतून या केंद्राची डागडुजी, आधुनिकीकरण, डिजिटलायजेशन करण्यात येणार असून लवकरच हे केंद्र सुरू होईल. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याची इच्छा आहे, पण खासगी क्लासेसची फी भरू शकत नाही अशा अहमदनगर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.