महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आ.अमित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं. या चर्चांनंतर आता अमित देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. “कितीही वादळं आली तरीही लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार”, असं अमित देशमुख यांनी भाजपला ठणकावलं आहे. अमित देशमुख यांच्या या विधानामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण संभाजी पाटील निलंगेकर यांचा रोख नेमका कुणाकडे होता? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे.