एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार… खा.डॉ.अमोल कोल्हेंचा दमदार फिटनेस…व्हिडिओ

0
17

डॉ. अमोल कोल्हे अभिनयासह राजकारणातही सक्रिय आहेत. पण त्याचबरोबरीने कामाच्या गोंधळात ते त्यांच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसतात. असाच एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. अमोल यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते सुर्यनमस्कार करताना दिसत आहेत. एकाच वेळी त्यांनी चक्क १०८ सुर्यनमस्कार केले. गेले कित्येक दिवस त्यांचा हा प्रयत्न सुरु होता. अखेरीस त्यांचा हा प्रयत्न पूर्ण झाला. ४५ मिनिटं १५ सेकंदांमध्ये त्यांनी १०८ सुर्यनमस्कार पूर्ण केले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. “१०८ सुर्यनमस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न” असं अमोल यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं.