कर्नाटकसाठी चांगलंच आहे की…भाजपाच्या पराभवानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या…

0
43

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा आणि विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरले. भाजपाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपासून अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींपासून काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते होते. अखेर शनिवारी (१३) या चुरशीच्या लढतीचा निकाल लागला. यात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “कर्नाटकसारखं राज्य संधी देत आहे. काल आम्ही कर्नाटकमध्ये सत्तेत होतो, आज काँग्रेस आहे आणि उद्या आणखी कोणी असेल. ते कर्नाटक राज्यासाठी चांगलंच आहे. त्याची काही अडचण नाही.
लोकसभा निवडणुकीवर याचा परिणाम होणार नाही. लोकसभेची निवडणूक एक स्वतंत्र निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतील याचा सर्वांना विश्वास आहे,” असं मत अमृता फडणवीसांनी व्यक्त केलं.