अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या लग्नासाठी देश-विदेशातील प्रसिद्ध व्यतींनी प्री-वेडिंग इव्हेंटला हजेरी लावली आहे. प्री-वेडिंग इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी देश-विदेशातील सर्व स्टार्स सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर अंबानी कुटुंबाने या तीन दिवसीय कार्यक्रमात दररोज एक वेगळी थीम ठेवली आहे. या भव्य सोहळ्यातील एक परफॉर्मन्स खूप खास असणार आहे. या इव्हेंटमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी खास परफॉर्मन्स देताना दिसणार आहेत. या डान्सच्या रिहर्सलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या डान्स रिहर्सलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी परफॉर्मन्सची तयारी करताना दिसत आहेत. हे दोघेही राज कपूर आणि नर्गिस यांच्या ‘श्री 420’ या सुपरहिट चित्रपटातील ‘प्यार हुआ इकरार हुआ है’ या प्रसिद्ध गाण्यावर लिप-सिंक करताना आणि नाचताना दिसतात.
Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये नीता व मुकेश अंबानींचा रोमँटिक डान्स
- Advertisement -