अहमदनगर जिल्हात आणखी एका प्राथमिक शिक्षकाने केला आचारसंहितेचा भंग

0
34

अहमदनगर : व्हॉट्स अॅपवर एका नेत्याचे स्टेटस राजकीय ठेवल्या प्रकरणी नगर तालुक्यातील एका शिक्षकाविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे ५ एप्रिलला ही तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर आचारसंहिता कक्षाने ही तक्रार जिल्हा परिषदेकडे वर्ग केली आहे. नगर तालुक्यातील इसळक येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक धोंडिबा जाबाजी शेटे यांनी २५ मार्चला जिल्ह्यातील काही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो, फ्लेक्स असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाकडे केली होती.

त्यानंतर
आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची दखल घेऊन संबंधित जागेवरील फोटो व फ्लेक्स हटवले होते.त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांचा फोटो असलेले स्टेटस धोंडिबा शेटे यांनी ठेवल्याची तक्रार मानव विकास परिषदेचे तुकाराम गेरंगे यांनी केली आहे. ही तक्रार त्यांनी ५ एप्रिलला फोटोसह आचारसंहिता कक्षाकडे दिली आहे. तक्रारीत म्हटले की २८ मार्च ते ५ एप्रिल या काळात धोंडिबा शेटे यांनी आचारसंहितेचा भंग करून राजकीय नेत्याचे स्टेटस ठेवले त्याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील भगवान फसले या शिक्षकाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोदी सरकारचा प्रचार होईल अशी पोस्ट टाकली होती. याबाबत यांनी ४ एप्रिलला आचारसंहिता कक्ष व जिल्हा परिषदेकडे तक्रार केली.