शिवसेनेने उपनेता बनवले…तरीही अर्जुन खोतकर मुख्यमंत्री शिंदे गटात दाखल

0
797

शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आज प्रत्यक्षात खोतकर शिंदे गटात सहभागी झाली आहे.