राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून, याकडे संपर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या की उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तत्पूर्वी या सुनावणीवर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल, काय नाही होणार यामुळे शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेले असल्याचं खैरे म्हणाले आहे.






