शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू हे दोघेही मंत्रिपदासाठी स्पर्धेत आहेत. मात्र अमरावतीत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असून बच्चू कडू यांनीही आक्रमपणे राणा यांच्यावर पलटवार केला आहे.
‘मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, पैसे सबका रुपया,’ असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांची जीभ घसरली आहे. ‘अबे हरामखोराची औलाद…आम्ही जर गुवाहटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे,’ असं आमदार कडू यांनी म्हटलं आहे.
आम्ही बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाहीत, असं म्हणत बच्चू कडू यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.






