Monday, April 22, 2024

अहमदनगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण….. तीन आरोपींचे जामीन….

अहमदनगर – नगर अर्बन बँकेच्या २५१ कोटींच्या घोटाळा प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत. यातील संचालक, अनिल चंदुलाल कोठारी (रा. माणिकनगर), अशोक माघवलाल कटारिया, (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारने, जि. अहमदनगर), तज्ञ संचालक शंकर घनशामदास अंदानी (रा.भगत मळा, सावेडी, अहमदनगर) यांचा जमीन अर्ज कोर्टाने नामंजूर केला आहे. वरील आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते, आता हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सन २०१४ ते २०१९ या काळात सदर आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्र, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रे तसेच अनेक प्रकरणे मंजुर केली. सदर आरोपी यांचे खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. तसेच ऐपत नसताना अनेक कर्ज मंजुर केलेली दिसत आहे. सदर फॉरेन्सीक ऑडीटमध्ये अनेक कर्ज प्रकरणात आरोपीचा सहभाग दिसून येत आहे.यातील आरोपी हे संचालक असताना गैरव्यवहार केला आहे. तसेच तज्ञ संचालक शंकर अदानी याचे खात्यावर आठ लाख रूपये आल्याचे दिसून आले आहे. सदर प्रकरणात अर्बन बँकेचे अनेक संचालक फरार आहेत. तसेच अशोक कटारिया यांचे खात्यावर ४५ लाख रूपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सरकार पक्षाच्यावतीने असा युक्तीवाद करण्यात आला. या जामीन अर्जावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल घोडके व मंगेश दिवाणे यांनी युक्तीवाद केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles