बाळासाहेब थोरात ‘मॉर्निंग वॉक’दरम्यान पडले; हाताला दुखापत…

0
23

बाळासाहेब थोरात ‘मॉर्निंग वॉक’दरम्यान पडले; हाताला दुखापत झाल्याने मुंबईला हलवणार
काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज ( २६ नोव्हेंबर ) पहाटे सेमिनरी हिल्स परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडलं आहे. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल करण्यात आलं आहे. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.