मुंबई: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या नाराजीवर महत्त्वाचे भाष्य केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. आज माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मला काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नाराजी दूर झाली का? या प्रश्नाचे बाळासाहेब थोरात यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.






