बीड : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नी ची गळा आवळून हत्या करत पतीने दरोड्याचा बनाव केल्याची घटना बीड तालुक्यातील रंजेगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड पोलिसांनी अवघ्या काही तासात घटनेचा छडा लावत आरोपी पती ला बेड्या ठोकल्या. ज्योती अबुज असे मयत महिलेचे नाव आहे तर दिनेश अबुज असे आरोपी पतीचे नाव आहे. महिलेला विवस्र करून तिची हत्या करण्यात आली होती. तर पती आणि मुलांना बांधून ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. पतीचे दुसरीकडे विवाहबाह्य संबंध सुरु होते. यावरुन पती-पत्नीत वाद सुरु होता. याच वादातून पतीने हे कृत्य केल्याची आरोपीने कबुली दिली.
आरोपी पती दिनेश अबुज हा एका महिलेच्या प्रेमात पडला होता. याची भनक पत्नी ज्योतीला लागली. एके दिवशी दिनेश झोपल्यानंतर पत्नी ज्योती हिने त्याच्या हाताच्या ठशाच्या माध्यमातून मोबाईल लॉक उघडला आणि संपूर्ण मोबाईलची तपासणी केली. व्हाट्सप चॅटमध्ये एका महिलेसोबतचे चॅट तिने पाहिले. याबाबत सकाळी पतीकडे विचारपूस केल्यानंतर दोघात वाद चिघळला. दररोज याच कारणावरून घरात वाद होऊ लागला. यातूनच काल मध्यरात्रीच्या सुमारास दिनेश याने पत्नीची गळा दाबून हत्या केली






