बीड पुन्हा हादरलं, अपहरणाचा बनाव अन् पंकजा मुंडेंचं नाव, गुन्हा दाखल

0
61

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलाय. बीडमधील कायदा सुव्यस्थ राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करूण हत्या करण्यात आली होती. याची राज्यात चर्चा असतानाच आता बीडमधील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलेय. एका व्यक्तीने आपल्याच अपहरणाचा बनाव केला अन् मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यानं बीडमधील दोन समाजात केढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अपहरणाचा बनाव करून पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करीत त्यांची बदनामी आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे रा. कळमअंबा, ता. केज याच्याविरुद्ध बीडच्या केज पोलिसांत गुन्हा दाखल झालाय.

कळमअंबा येथील ज्ञानेश्वर इंगळे याने १ जानेवारीला पहाटे ५ वाजेच्या सुमारास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून २० लाख रुपयांचे पत्र आणायचे आहे, त्यासाठी पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे आहेत, असे सांगून दत्ता तांदळे यांनी मला मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवून नेले. अपहरण व मारहाण करून जवळील दोन लाख रुपये व मोबाइल काढून घेतल्याचे आणि पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे होते, असा उल्लेख करीत अपहरण केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर दिल्या.