बीडमध्ये आता पुन्हा एकदा काका-पुतण्याचा संघर्ष समोर आला आहे. बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. क्षीरसागर कुटुंबातील आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत आहेत, त्यानंतर आता डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासोबत काही नेत्यांचेही प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटात झाले.
बीडच्या विकासाचा मनापासून प्रयत्न करायचा आहे. योगेश क्षीरसागर आपल्यासोबत आले आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या नात्याने मी त्यांचं स्वागत करतो, असं अजित पवार म्हणाले.






