सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर फरार आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आलीय. केज तालुक्यातील मस्साजोग हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय. आज सकाळी बीड पोलिसांनी पुण्यातून या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर एकाजणाला कल्याणमधून ताब्यात घेतलं. दरम्यान या प्रकरणात मोठा खुलासा झालाय.सरपंच देशमुख यांच्या हालचालीची माहिती त्यांच्या गावातील व्यक्ती देत होता अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिलीय. कल्याणमधून ताब्यात आलेला तिसरा व्यक्तीच सरपंच यांचे लोकेशन मारेकऱ्यांना देत होता. या व्यक्तीच नाव सिद्धार्थ सोनवणे असून हा आरोपींना लोकेशनची महिती देत होता. दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना आधीच अटक झालीय.
आज सुदर्शन घुळे आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलंय. तर कृष्णा आंधळे अजून फरार आहे. देशमुख यांची टीप देणारा सिद्धार्थ सोनवणे याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उसाच्या गाडीवरून अटक केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी सिद्धार्थ सोनवणे आरोपींना त्यांचे लोकेशन देत होता. दरम्यान त्याच्या अटकेने या प्रकरणाचा उलगडा होण्यास मोठी मदत होणार आहे.
अपहरण करण्यासाठी सिद्धार्थ सोनवणे हा आरोपींना सरपंच यांचे लोकेशन देत होता. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना गुन्हे शाखेने सुरुवातीला गावाताच लक्ष केंद्रीत केलं होतं. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी गावातून आरोपींना माहिती देत असावा असा संशय पोलिसांना होता. त्याप्रकरणी पोलिसांना तपास सुरू केला. पोलीस टी देणाऱ्याच्या शोधात आहेत, ही माहिती होताच सिद्धार्थ सोनवणे गावातून पळाला होता. सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याची खात्री पोलिसांनी पटली.






