वाल्मिक कराडला पोलिस कोठडी मिळताच पोलिस ठाण्यात नवीन पलंग! आ.रोहित पवारांनी साधला निशाणा…

0
24

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान, वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याबद्दल पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून हे पलंग आम्ही स्वत:साठी मागवले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आता यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

रोहित पवार म्हणाले, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.