शरद पवारांच्या सभेला गर्दी जमवा…चक्क प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकर्त्यांना संदेश

0
21

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भंडाऱ्यात सभा होणार आहे. अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत आहे. या सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शरद पवार यांच्या इतर सभांप्रमाणेच ही सभा मोठी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्या सभेला गर्दी करण्याच्या सूचना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आपल्या जिल्ह्यात आलेत तर, मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी जाणार आहे. तुम्ही पण या. गर्दी जमवण्यासाठी आपण जावू, त्यांच स्वागत करू, असं खुद्द प्रफुल पटेल म्हणाले. साहेबांच्या सभेला आपल्याशिवाय कोणीही गर्दी करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आपण आवर्जून जाऊ. भाषणात माझ्याविरुद्ध बोलले तरी ते ऐकून घेऊ, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.