मराठा आरक्षण आंदोलकांवर जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीमारप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर माफी मागितली. पण, ती पुरेशी नसल्याचे सांगत राजीनामा का नाही, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी नंदूरबार येथे केली होती. तिचा खरपूस समाचार भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी घेतला.
‘जनाची नाही मनाची नाही, निदान नवाबाची तरी…’असे म्हणत देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या संबंधित मंडळींशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या आपल्याच पक्षाचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे राष्ट्रवादीचे आजोबाजीवी नॉटी नातू आज देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहेत, असा टोला लगावला आहे.
जनाची नाही मनाची नाही निदान नवाबाची तरी…
देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या संबंधित मंडळींशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या आपल्याच पक्षाच्या कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा शेवटपर्यंत राजीनामा न घेणारे राष्ट्रवादीचे आजोबाजीवी नॉटी नातू आज देवेंद्रजींचा राजीनामा मागत आहेत… pic.twitter.com/o2mAS1Eixh— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 5, 2023