राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपची जय्यत तयारी, केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी

0
819

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ४ राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. यात राजस्थानसाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर, हरियाणासाठी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, कर्नाटकसाठी पर्यटनमंत्री जी.किशन रेड्डी, तर महाराष्ट्रासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची प्रभारी म्हणून घोषणा केली आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी भाजपने आपला अतिरीक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे, अशा ठिकाणी प्रभारींची घोषणा करण्यात आल्याच पाहायला मिळत आहे.